विस्तारअधिकारी
(गटशिक्षणअधिकारी)
दुगाव केंद्र माझ्या बीटा मध्ये समाविष्ट आहे. निसर्गाचे सानिध्य लाभलेले हे केंद्र विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणालीसाठी प्रसिद्ध आहेत. केंद्रातील सर्व शाळांच्या इमारती स्वमालकीच्या व पुरेसे वर्ग उपलब्ध असलेल्या आहेत. प्रत्येक शाळेत मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे पाण्याची सोय, वीज इ. सुविधा उपलब्ध असून श्री जयंत जाधव सर केंद्रप्रमुख म्हणून छान काम करत आहेत.
केंद्रप्रमुख
सन २०१९-२० पासून मी दुगाव केंद्राचा प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून पदभार सांभाळत आहे. शासनाचे विविध उपक्रम , विद्यार्थी लाभाच्या योजना, विद्यार्थी शैक्षणिक दर्जेदार उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न मी करत असतो. केंद्राच्या सगळ्या शाळा डिजिटल असून, त्या साहित्याचा वापर दैनंदिन अध्यापनात केला जातो. सर्व शाळा व शिक्षकांचे चांगले सहकार्य लाभते.